वापर अटी
हा वापरकर्ता करार माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 ("अधिनियम") आणि त्याअंतर्गत लागू केलेल्या नियमांच्या तरतुदींअंतर्गत आणि माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) कायदा, 2008 द्वारे सुधारित केलेल्या विविध कायद्यांमधील इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डशी संबंधित सुधारींच्या अंतर्गत एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे. हा वापरकर्ता करार संगणकाद्वारे तयार केलेला आहे आणि म्हणून यावर कोणत्याही भौतिक किंवा डिजिटल स्वाक्षरीची आवश्यकता नाही.
हा वापरकर्ता करार माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे) नियम, 2011 च्या नियम 3 (1) च्या तरतुदींनुसार प्रकाशित केला आहे ज्या अंतर्गत ondc.org (“वेबसाइट”) च्या अॅक्सेस आणि/किंवा वापरासाठी नियम आणि अधिनियम, गोपनीयता धोरण आणि अटी आणि शर्ती प्रकाशित करणे आवश्यक आहे.
या वापर अटी आणि शर्तींमध्ये ("वापरअटी"), खालील शब्दांचा अर्थ खाली नमूद केल्याप्रमाणे असेल:
"वापरकर्ता" म्हणजे कोणत्याही कम्युनिकेशन डिवाइसने वेबसाइटला भेट देणारे, अॅक्सेस आणि/किंवा वापर करणारे तुम्ही किंवा इतर कोणतीही व्यक्ती.
"ONDC" चा संदर्भ ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स असा आहे. ही कंपनी भारतीय कंपनी कायदा, 2013 अंतर्गत समाविष्ट केलेली आहे, ज्याची कॉर्पोरेट आयडेंटिटी आहे आणि ज्याचा नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता आहे जो या वेबसाइटवरील सर्व अधिकारांचा मालक आहे. कृपया क्लायंटकडून हे तपशील मिळवा.
"तुम्ही" आणि "तुमचे" यांचे सर्व संदर्भ म्हणजे वापरकर्ता असा होय.
“ONDC”, “कंपनी”, “आम्ही”, “आमचे” आणि “आपले” चे सर्व संदर्भ म्हणजे ONDC Ltd. असा होय.
हा तुमचा, म्हणजे वेबसाइटचे वापरकर्ते आणि कंपनी यांच्यातील कायदेशीर आणि बंधनकारक करार आहे आणि तुमच्या वेबसाइटचा वापर नियंत्रित करणाऱ्या अटी नमूद करतो. या वेबसाइटला अॅक्सेस करून, तुम्ही वापरअटींचे पालन करण्याचे, त्यास बांधील राहण्याचे आणि त्यांचे अनुसरण करण्याचे वचन, संमती आणि सहमती देता आणि आणि जर तुम्ही या वापर अटींशी सहमत नसाल, तर तुम्ही वेबसाइटला अॅक्सेस करू नये किंवा त्याचा वापर करू नये आणि त्यानंतर केलेला कोणताही अॅक्सेस किंवा वापर, तुमच्याद्वारे वापर अटींची स्वीकृती आणि संमती म्हणून समजला जाईल.
वेबसाइटला अॅक्सेस करून आणि/किंवा वापरून, तुम्ही या बंधनकारक वापर अटी स्वीकारण्यासाठी तुमची सहमती दर्शवता. हा दस्तऐवज म्हणजे कंपनी आणि तुमच्या दरम्यान झालेला एक कायदेशीर बंधनकारक वापरकर्ता करार आहे. तुम्ही खालीलपैकी एखाद्या किंवा सर्व वापर अटींशी (गोपनीयता धोरणासह) सहमत नसल्यास, कृपया वेबसाइटला अॅक्सेस आणि/किंवा त्याचा वापर करू नये.
आम्ही आमच्या विवेकबुद्धीनुसार, पूर्वसूचनेशिवाय कोणत्याही वेळी या वापर अटी बदलण्याचा, सुधारित करण्याचा किंवा अन्यथा त्यांना पर्याय देण्याचा अधिकार राखून ठेवतो. असे बदल आणि/किंवा सुधारणा वेबसाइटवर पोस्ट/प्रकाशित केल्यावर लगेच प्रभावी होतील.
कृपया वेळोवेळी वापरअटींचे पुनरावलोकन करा. बदल आणि/किंवा सुधारणा पोस्ट केल्यानंतर जर तुम्ही वेबसाइटचा वापर सुरू ठेवला, तर ते या सर्व सुधारित वापर अटींची तुमची स्वीकृती मानली जाईल. जर कंपनीला कधीही वाटले की या वापर अटींचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन झाले आहे, तर अशा उल्लंघन करणार्या व्यक्तिला संपूर्ण वेबसाइट किंवा काही भागाचा अॅक्सेस नाकारण्याचा किंवा निलंबित करण्याचा अधिकार कंपनी राखून ठेवते.
1. वेबसाइटचा अॅक्सेस
- ही वेबसाइट केवळ 18 वर्षांवरील (किंवा 1875 च्या सज्ञानता कायद्यानुसार पालक म्हणून नियुक्त केलेल्या 21 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या) (“सज्ञानता वय”) वापरकर्त्यांसाठीच तयार आणि उपलब्ध केली जाते.
- तुम्ही सज्ञानता वयापेक्षा कमी असून वेबसाइटचा वापर करत राहिल्यास, कंपनी असे गृहीत धरेल की तुम्ही या वापर अटींचे आणि गोपनीयता धोरणाचे तुमच्या पालक/कायदेशीर पालकासोबत पुनरावलोकन केले आहे आणि तुमच्या पालकांना/कायदेशीर पालकांना हे समजले आहे आणि ते तुमच्या वतीने सहमती देत आहेत. वेबसाइटला अॅक्सेस करतांना आणि/किंवा वापरतांना तुम्ही सज्ञानता वयाखालील असाल, तर वेबसाइटचा तुमचा अॅक्सेस आणि वापर पालकांच्या/कायदेशीर पालकांच्या संमतीच्या अधीन आणि नेहमीच पालक/कायदेशीर पालकांच्या मार्गदर्शनाखाली असल्याचे मानले जाईल. तुम्ही आणि तुमचे पालक/कायदेशीर पालक याची पुष्टी करता की ही वेबसाइट तुम्हाला तुमच्या मनोरंजनासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि या वापर अटी कंपनी आणि तुमच्या वतीने करार करत असलेल्या तुमच्या पालक/कायदेशीर पालक यांच्यातील कायदेशीर बंधनकारक वापरकर्ता करार असेल. जेथे वापरकर्ते सज्ञानता वयापेक्षा लहान असतील, तेथे "वापरकर्ता", "तुम्ही" आणि "तुमचे" या सर्व संदर्भांच्या अर्थामध्ये तुम्ही आणि तुमच्या फायद्यासाठी आणि तुमच्या वतीने काम करणारे तुमचे पालक/कायदेशीर पालक यांचा समावेश असेल.
- वेबसाइटवर ऑफर केलेला काही कंटेंट कदाचित काही वापरकर्त्यांसाठी योग्य नसू शकतो आणि म्हणून दर्शक विवेक/पालकांची विवेकबुद्धी वापरण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, असे होऊ शकते की वेबसाइटवर ऑफर केलेला काही कंटेंट सज्ञानता वयापेक्षा कमी वयाच्या दर्शकांसाठी योग्य नसेल. तुम्ही सज्ञानता वयापेक्षा कमी वयाचे असल्यास, तुम्ही तुमच्या पालकांच्या/कायदेशीर पालकांच्या पूर्व संमतीनेच कंटेंट पाहू शकता. पालकांना/कायदेशीर पालकांना त्यांच्या मुलांना आणि/किंवा पाल्यांना या वेबसाइटवर आणि/किंवा कोणत्याही कंटेंटला (नंतर परिभाषित केल्याप्रमाणे) अॅक्सेस करण्याची परवानगी देण्यापूर्वी विवेकाचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. तुमचा वेबसाइटचा अॅक्सेस आणि वापर या वापर अटी, गोपनीयता धोरण आणि भारतातील सर्व लागू कायदे, नियम आणि अधिनियमांच्या अधीन आहे.
- कंपनी तुम्हाला या वापर अटींनुसार, केवळ गैर-व्यावसायिक वापरासाठी आणि केवळ खाजगी पाहण्यासाठी, वेबसाइट अॅक्सेस करण्याचा आणि वापरण्याचा वैयक्तिक, रद्द करण्यायोग्य, अनन्य, गैर-हस्तांतरणीय अधिकार प्रदान करते. या वापराच्या अटी, वेबसाइटवरील तुमचा वापर आणि कोणताही डेटा, संदेश, मजकूर, प्रतिमा, ऑडिओ, ध्वनी, आवाज, कोड, कम्प्युटर प्रोग्रॅम, सॉफ्टवेअर, डेटाबेस, मायक्रोफिल्म, व्हिडिओ, माहिती, कंटेंट आणि तुम्ही होस्ट, प्रकाशित, शेअर, देवाण-घेवाण, प्रदर्शन आणि/किंवा अपलोड करणार्या इतर कोणत्याही माहिती किंवा कंटेंट वर नियंत्रण ठेवतात.
- कृपया लक्षात घ्या की तुमच्या क्षेत्रातील वेबसाइटची उपलब्धता आणि वेबसाइटचा वापर करण्याची तुम्हाला देण्यात आलेली सुविधा कंपनीच्या विवेकाधीन आहे. कंपनी आपली विवेकानुसार काही विशिष्ट भौगोलिक स्थानांवर वेबसाइटचा वापर प्रतिबंधित करू शकते. तुम्ही हमी देता की वेबसाइटचा तुमचा वापर सर्व लागू कायद्यांचे (वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार) पालन करेल. तुम्ही समजता की वेबसाइटचा आणि त्यातील कंटेंटचा अॅक्सेस तुमच्या क्षेत्र, उपकरणाची वैशिष्ट्ये, इंटरनेट कनेक्शन इत्यादींवर अवलंबून असेल. तुम्ही कबूल करता आणि सहमत आहात की आम्ही तुम्हाला फक्त वेबसाइटचा वापर करू देऊ आणि इंटरनेट, मोबाइल आणि/किंवा तुमच्या वापराशी संबंधित इतर कनेक्शन, ऑपरेटर आणि सेवा शुल्क इत्यादींसाठी आवश्यक असलेल्या सर्व डिवाइसची जबाबदारी पुर्णपणे तुमची असेल.
2. बौद्धिक संपत्ती अधिकारांची मालकी
खालील शब्दांचा अर्थ खाली नमूद केल्याप्रमाणे असेल:
- "बौद्धिक संपदा अधिकार" मध्ये त्यांच्या नूतनीकरण आणि विस्तरांसह सर्व पेटंट, ट्रेडमार्क, सेवा चिन्ह, लोगो, कॉपीराइट, डेटाबेस अधिकार, ट्रेड नावे, ब्रँड नावे, व्यापार रहस्ये, डिझाइन अधिकार आणि कंपनीचे तत्सम मालकी हक्क सामील असतील, मग ते नोंदणीकृत असो वा नसो.
- वेबसाइटवरील बौद्धिक संपदा अधिकारातील सर्व हक्क, शीर्षक आणि स्वरस्यापर्यंत मर्यादित न राहता, त्यातील सर्व घटक, कंटेंट, मजकूर, प्रतिमा, ऑडिओ, ऑडिओ-व्हिज्युअल, साहित्यिक कार्य, कलात्मक कार्य, संगीत कार्य, कम्प्युटर प्रोग्राम, नाटकीय कार्य, ध्वनीमुद्रण, सिनेमॅटोग्राफ चित्रपट, व्हिडिओ रेकॉर्डिंग, कॉपीराईट अधिनियम, 1957 च्या अंतर्गत कार्यप्रदर्शन आणि प्रसारण, विशिष्ट सूचना, ऍबस्ट्रक्ट, सारांश, कॉपी स्केच, रेखाचित्रे, कलाकृती, सॉफ्टवेअर, सोर्स कोड, ऑब्जेक्ट कोड, सोर्स कोड आणि ऑब्जेक्ट कोडवरील टिप्पण्या, डोमेन नावे, अॅप्लिकेशन नावे, डिझाइन, डेटाबेस, साधने, चिन्ह, मांडणी, प्रोग्राम, शीर्षके, नावे, हस्तपुस्तिका, ग्राफिक्स, अॅनिमेशन, गेम्स, अॅप्लिकेशन, युजर इंटरफेस सूचना, छायाचित्रे, कलाकारांचे प्रोफाइल, चित्रं, विनोद, मीम्स, स्पर्धा आणि इतर सर्व घटक, डेटा, माहिती आणि साहित्य ("साहित्य") कंपनी आणि/किंवा त्याचे परवानाधारक आणि/किंवा इतर संबंधित मालकांची मालमत्ता आहे आणि भारत आणि जगाच्या बौद्धिक संपदा हक्क कायद्यांपर्यंत मर्यादित न राहता, संरक्षित आहे. कंपनी वेबसाइटचे संपूर्ण, अखंड आणि निरपेक्ष शीर्षक आणि त्यातील सर्व बौद्धिक संपदा हक्क राखून ठेवते.
- वेबसाइट व त्यावरील साहित्य केवळ तुमच्या गैर-व्यावसायिक वैयक्तिक वापरासाठी आणि फक्त अशा कालावधीसाठीच आमच्याकडून तुम्हाला गैर-विशेष परवान्याच्या स्वरुपात दिले आहे असे मानले जाईल जो पर्यंत आमच्या विवेकबुद्धीनुसार आम्हाला योग्य वाटेल. तुम्ही कुठल्याच प्रकारे (सॉफ्टवेअर, कोडींग, घटक, तत्व, साहित्य, इत्यादी सह, परंतु यापर्यंतच मर्यादित न राहता) वेबसाइटचा वापर, पुनरुत्पादन, पुनर्वितरण, विक्री, भाडेतत्वावर देणे, डिकंपाइल, रिव्हर्स इंजिनिअर, डिससेम्बल, रूपांतर, सार्वजनिक संवाद, डेरिव्हेटिव्ह कार्य, वेबसाइटच्या अखंडतेमध्ये व्यत्यय आणणार नाही.
- तुम्ही स्पष्टपणे प्रमाणित करता की तुम्ही सध्या उपस्थित आणि पुढे विकसित होणार्या कोणत्याही माध्यमातून वेबसाइटची आणि वेबसाइटमध्ये (त्यातील कोणत्याही आणि सर्व कंटेंट सह) (संपूर्ण किंवा अंशतः) प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कॉपी, पुनरुत्पादन, सुधारणा, संपादन, पुन्ह: संपादन, संशोधन, बदल, भिन्नता, वर्धित, अपग्रेड, व्युत्पन्न कामे, भाषांतर, रुपांतर, संक्षिप्त, रद्द, प्रदर्शित, प्रकाशित, वितरित. प्रसारित करणे, सार्वजनिक संवाद, वाटप, उद्घोषणा, ट्रान्समीट, विक्री, भाड्याने, लीजवर, उधार, नियुक्त, परवाना, उप-परवाना, डिससेम्बल, डिकंपाइल, रिव्हर्स इंजिनियर, मार्केट, जाहिरात, प्रसार, शोषण, डिजिटल बदल किंवा फेरफार करणार नाही.
3. वापरकर्ता साहित्य
- वेबसाइट वापरकर्त्यांना कंटेंट, डेटा, माहिती, मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ, ऑडिओ, ऑडिओ-व्हिज्युअल, वापरकर्ता मते, शिफारसी, सल्ला, दृश्य इत्यादी प्रकाशित करण्यास अनुमती देऊ शकते; ("वापरकर्ता साहित्य"). वापरकर्ता साहित्य कंपनीचे मत प्रतिबिंबित करत नाही. कोणत्याही परिस्थितीत कंपनीला कोणत्याही वापरकर्ता कंटेंटसाठी जबाबदार धरले जाणार नाही, कंपनी कोणत्याही वापरकर्ता कंटेंटचे समर्थन किंवा शिफारस करत नाही किंवा वेबसाइटवर वापरकर्ता कंटेंटच्या प्रकाशनामुळे होणारे नुकसान किंवा नुकसानीसाठी कंपनी जबाबदार असणार नाही.
- वापरकर्ता साहित्य सबमिट करून, तुम्ही कंपनीला कायमस्वरूपी, जगभरात, रॉयल्टी-मुक्त, अपरिवर्तनीय, नॉन-एक्सक्लुझिव्ह परवाना देता आणि वापरकर्ता साहित्याचा वापर पूर्ण किंवा अंशतः, आता ज्ञात किंवा यापुढे विकसित केलेल्या कोणत्याही आणि सर्व माध्यमांमध्ये, वापरकर्ता साहित्य वापरण्यासाठी अधिकृत करता. तुम्ही सहमत आहात की अशा परिस्थितीत, तुम्ही कंपनीकडून कोणत्याही सूचना किंवा नुकसान भरपाईसाठी पात्र नाही.
- कंपनीला कधीही, कोणत्याही प्रकारे आणि त्यांच्या विवेकानुसार सामान्यतः वेबसाइटवरील कोणत्याही चॅट क्षेत्रावर किंवा त्याद्वारे उपलब्ध असलेले वापरकर्ता साहित्य आणि/किंवा कंटेंटचे निरीक्षण करणे, काढणे, निलंबित करणे, नष्ट करणे, वापरणे आणि बदलणे याचा अधिकार राहील, पण असे करणे बंधनकारक राहणार नाही. जरी कंपनी वेबसाइटवर पोस्ट केलेल्या वापरकर्ता साहित्याचे वेळोवेळी निरीक्षण करण्याचा प्रयत्न करेल, तरी कंपनी त्यासाठी जबाबदार राहणार नाही.
- जर कंपनीने एखाद्या प्रोग्राम किंवा उत्पादनाचे पुनरवलोकन वेबसाइट वर टाकले किंवा ठेवले, मग ते तृतीय पक्षाचे असो, स्वतःचा कंटेंट असो किंवा इतर कुणाचे मत असो, अशी सगळी मते ही फक्त लेखकाची मते असतील आणि कंपनीची नाहीत.
- वेबसाइटवर वापरकर्ता साहित्य पोस्ट करून, तुम्ही कंपनीला वचन देता, प्रतिनिधित्व करता आणि हमी देता की: (अ) वापरकर्ता साहित्य मूळ आहे; (b) बौद्धिक संपदा अधिकारांसह, पण त्या पुरते मर्यादित न राहता, कोणत्याही तृतीय पक्षाच्या अधिकारांचे उल्लंघन करत नाही; आणि (c) कोणत्याही व्यक्ती, विशिष्ट संस्था, गट, जात, धर्म, वंश किंवा समुदायासाठी बदनामीकारक, अपमानास्पद किंवा शिवीगाळ करणारे, किंवा दुर्भावनापूर्ण किंवा दुखावणारे किंवा देशद्रोही किंवा पोर्नोग्राफिक किंवा अश्लील किंवा कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारे नाही.
- तुम्ही सहमती देता, करार करता आणि वचन देता की तुम्ही कोणताही डेटा, माहिती, कंटेंट किंवा संदेश होस्ट, प्रदर्शित, अपलोड, सुधारित, प्रकाशित, प्रसारित, अपडेट किंवा सामायिक करणार नाही:
- जो दुसर्या व्यक्तीचे आहे आणि ज्यावर तुम्हाला कोणताही अधिकार नाही;
- जो घोर हानीकारक, त्रासदायक, निंदनीय बदनामीकारक, अपमानास्पद, अश्लील, पोर्नोग्राफिक, पेडोफिलिक, निंदनीय, दुसर्याच्या गोपनीयतेवर आक्रमण करणारे, द्वेषपूर्ण, किंवा वांशिक, जातीय दृष्ट्या आक्षेपार्ह, अपमानास्पद आहे किंवा अवैध सावकारीशी किंवा जुगराशी संबंधित किंवा प्रोत्साहन देणारे, किंवा इतर कोणत्याही प्रकारे गैरकायदेशीर आहे;
- जो कोणत्याही प्रकारे अल्पवयीन मुलांचे नुकसान करते;
- जो कोणत्याही पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट किंवा इतर मालकी हक्क किंवा बौद्धिक संपदा अधिकारांचे उल्लंघन करते;
- जो कोणत्याही लागू राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय कायदे, नियम, अधिनियम आणि/किंवा मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करतो;
- जो वाचणार्या व्यक्तीचे अशा संदेशांच्या उत्पत्तीबद्दल फसवणूक करतो किंवा दिशाभूल करतो किंवा अशी माहिती संप्रेषण करतो जी अत्यंत आक्षेपार्ह किंवा धोकादायक आहे;
- जो दुसऱ्या व्यक्तीची तोतयागिरी करते;
- ज्यात कोणत्याही संगणक संसाधनाच्या कार्यक्षमतेमध्ये व्यत्यय आणण्यासाठी, नष्ट करण्यासाठी किंवा मर्यादित करण्यासाठी डिझाइन केलेले सॉफ्टवेअर व्हायरस किंवा इतर कोणतेही संगणक कोड, फाईल किंवा प्रोग्राम आहेत;
- जो भारताची एकता, राष्ट्रीय हित, अखंडता, संरक्षण, सुरक्षा किंवा सार्वभौमत्व, परकीय राज्यांशी मैत्रीपूर्ण संबंध किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करेल किंवा कोणत्याही दखलपात्र गुन्ह्यासाठी चिथावणी देईल किंवा कोणत्याही गुन्ह्याच्या तपासाला प्रतिबंध करेल किंवा इतर कोणत्याही राष्ट्राचा/देशाचा अपमान करेल;
- जो आक्षेपार्ह किंवा घातक स्वरूपाचा आहे;
- ज्यामुळे चीड, गैरसोय, धोका, अडथळा निर्माण होतो, आणि जो अपमान, इजा, गुन्हेगारी धमकी, शत्रुत्व, द्वेष किंवा वाईट इच्छेला कारणीभूत ठरते;
- जो त्रासदायक किंवा गैरसोयीचे कारण बनतो किंवा ज्याचा हेतु अशा संदेशांच्या उत्पत्तीबद्दल वाचकाची किंवा प्राप्तकर्त्याची फसवणूक करण्याचा किंवा दिशाभूल करण्याचा असतो.
- आपण पुढे वचन देता की आपण वेबसाइटचा वापर यासाठी करणार नाही:
- कोणत्याही व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकाराचे किंवा वैयक्तिक अधिकाराचे किंवा गोपनीय माहितीचे उल्लंघन करणे;
- सायबर दहशतवादाचे कृत्य समजले जाऊ शकते असे कृत्य करणे;
- कोणत्याही वापरकर्त्याची किंवा व्यक्तीची खाजगी/वैयक्तिक माहिती गोळा करणे, संग्रहित करणे आणि/किंवा ओळखणे;
- इतर व्यक्ती, संस्था, गट, जाती, धर्म, वंश किंवा समुदायांवर वैयक्तिक हल्ले करण्यास मदत करणे;
- दुसर्या व्यक्तीला किंवा वापरकर्त्याचा पाठलाग किंवा त्याला अन्यथा त्रास देणे;
- तुम्हाला कोणत्याही कायद्यानुसार किंवा करारानुसार प्रसारित करण्याचा अधिकार नसलेला कोणताही कंटेंट अपलोड, पोस्ट किंवा ई-मेल करणे;
- कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाचे गोपनीयतेचे अधिकार, बौद्धिक संपदा अधिकार किंवा इतर तृतीय पक्ष अधिकारांचे उल्लंघन करणारा कोणताही कंटेंट अपलोड, पोस्ट किंवा ई-मेल करणे;
- कोणत्याही अवांछित किंवा अनधिकृत जाहिराती, प्रचारात्मक साहित्य, जंक-मेल, स्पॅम, साखळी पत्रे किंवा इतर कोणत्याही प्रकारची विनंती अपलोड, पोस्ट किंवा ई-मेल करणे;
- कोणत्याही संगणक सॉफ्टवेअर, हार्डवेअर, उपकरणे, प्लॅटफॉर्म किंवा दूरसंचार उपकरणे आणि/किंवा वेबसाइटच्या कार्यक्षमतेमध्ये व्यत्यय आणण्यासाठी, नष्ट करण्यासाठी किंवा मर्यादित करण्यासाठी डिझाइन केलेल्या फायली किंवा प्रोग्राम ज्यामध्ये संगणक व्हायरस किंवा इतर कोणतेही संगणक कोड, फायली किंवा प्रोग्राम समाविष्ट असलेली कोणतीही कंटेंट अपलोड, पोस्ट किंवा ई-मेल करणे;
- कंपनीच्या सर्व्हर, नेटवर्क्स किंवा खात्यांसह वेबसाइटमध्ये हस्तक्षेप करणे, नुकसान करणे, अक्षम करणे, व्यत्यय आणणे, बिघडवणे, त्यावर अनावश्यक भार निर्माण करणे किंवा अनधिकृत प्रवेश मिळवणे;
- संवादाच्या सामान्य प्रवाहात व्यत्यय आणणे, वेबसाइटचे इतर वापरकर्ते टाइप करू शकतील त्यापेक्षा अधिक वेगाने स्क्रीन स्क्रोल होण्यास कारणीभूत ठरणे, किंवा अन्यथा रीअल-टाइम देवाण-घेवाणमध्ये व्यस्त राहण्याच्या इतर वापरकर्त्यांच्या क्षमतेवर विपरित परिणाम होईल अशा पद्धतीने कार्य करणे;
- जाहिराती किंवा वेबसाइटचे इतर भाग कव्हर करणे, काढणे, अक्षम करणे, हाताळणे, ब्लॉक करणे किंवा अस्पष्ट करणे;
- वेबसाइटच्या इतर कोणत्याही वापरकर्त्याद्वारे किंवा त्याच्याशी संबंधित कोणतीही माहिती हटवणे किंवा सुधारणे;
- स्वतःसाठी आणि/किंवा कोणत्याही तृतीय-पक्षाच्या व्यवसाय क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे आणि/किंवा कमाई करणे;
- कलम 43, इ. आणि/किंवा इतर कोणत्याही लागू कायदे, नियम किंवा विनियमांतर्गत प्रतिबंधित असलेले कोणतेही क्रियाकलाप पार पाडणे;
- जाहिरातींसह अनधिकृत व्यावसायिक संप्रेषण पोस्ट करणे; आणि/किंवा
- इतर कोणत्याही वापरकर्त्याच्या वापरकर्ता साहित्यामध्ये फेरफार करणे किंवा मॉर्फ करणे किंवा बदलणे किंवा शोषण करणे.
- तुम्ही याद्वारे पुष्टी करता की तुमच्याद्वारे वेबसाइटवर प्रकाशित केलेला कोणताही कंटेंट, डेटा किंवा माहिती योग्य आहे की नाही आणि या वापर अटींचे पालन करणारा आहे की नाही हे निर्धारित करण्याचा कंपनीला अधिकार आहे आणि त्यानुसार कंपनी कोणतीही पूर्व सूचना न देता तुमचे सर्व वापरकर्ता साहित्य काढून टाकू शकते आणि तुमचा अॅक्सेस समाप्त करू शकते. कंपनीकडे कायद्यानुसार आणि/किंवा न्यायबुद्धीने आणि/किंवा या करारांतर्गत असलेल्या इतर कोणत्याही अधिकारांना आणि उपायांसाठी पूर्वग्रह न ठेवता असेल.
- तुम्ही वेबसाइटवर कोणतेही वापरकर्ता साहित्य सबमिट केल्यास, तुम्ही वापरकर्ता साहित्यामधील सर्व अधिकार, स्वारस्य आणि मालकी सोडून दिली आहे आणि वापरकर्ता साहित्य सार्वजनिक डोमेनमध्ये ठेवले आहे असे मानले जाईल, ज्यामुळे ते पुनर्वापर, पुनरुत्पादन, वितरण, लोकांसाठी संप्रेषण, रूपांतर, इ खुले राहील. वेबसाइटवर वापरकर्ता साहित्य प्रकाशित करण्याशी संबंधित जोखीम तुम्हाला समजली आहे आणि तुम्ही सहमत आहात की तुमच्याद्वारे पोस्ट केलेल्या कोणत्याही वापरकर्ता साहित्यात केलेल्या कोणत्याही डिजिटल बदल, फेरफार, मॉर्फिंग, बेकायदेशीर शोषण इत्यादीसाठी कंपनी जबाबदार किंवा उत्तरदायी असणार नाही.
- तुम्ही यापुढे सहमत आहात की इतर वापरकर्त्यांद्वारे कोणत्याही धमकी, बदनामीकारक, अपमानास्पद, अश्लील, आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर वर्तनासाठी किंवा तुमच्या बौद्धिक संपदा अधिकारांचे, गोपनीयता अधिकारांचे, वैयक्तिक अधिकारांचे इतर कोणत्याही उल्लंघनासाठी कंपनी तुम्हाला जबाबदार किंवा उत्तरदायी असणार नाही.
4. स्पर्धा आणि जाहिराती
वेबसाइटवर आयोजित किंवा घेतल्या जाणार्या कोणत्याही आणि सर्व स्पर्धा, जाहिराती आणि मोहिमा वेगळ्या स्पर्धेच्या अटी आणि शर्तींच्या अधीन आहेत ("स्पर्धा अटी आणि शर्ती") आणि तुम्हाला स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी स्पर्धेच्या अटी आणि शर्ती तसेच वापराच्या अटी वाचण्याची विनंती केली जाते. तसेच सहभाग घेतल्यावर, असे मानले जाईल की सहभागीने स्पर्धेच्या अटी आणि शर्ती वाचल्या आणि समजून घेतल्या आहेत. वापराच्या अटी एखाद्या विशिष्ट क्रियाकलापाच्या संदर्भात प्रदान केलेल्या स्पर्धेच्या अटी आणि शर्तींमध्ये संदर्भाद्वारे अंतर्भूत मानल्या जातात.
5. अस्वीकरण आणि दायित्वाची मर्यादा
तुम्ही वाचून, समजून घेतले आहे आणि तुम्ही सहमत आहात की वेबसाइटला अॅक्सेस करून आणि/किंवा वापरून, तुम्ही या अस्वीकरणाच्या अटींशी कायदेशीररित्या बांधील आहात. तुम्ही सहमत आहात की वेबसाइटला तुम्ही स्वतःच्या जोखमीवर आणि स्वेच्छेने अॅक्सेस करत आहात. वेबसाइट आणि त्यात असलेला सर्व कंटेंट कंपनीद्वारे “जसे आहे” आणि “जसे उपलब्ध आहे” या आधारावर वितरित आणि प्रसारित केला जातो. कंपनी आणि तिचे सहयोगी, असोसिएट आणि गट कंपन्या, त्यांचे संबंधित संचालक, प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी, कर्मचारी, अधिकारी, शेअरहोल्डर, एजंट, प्रतिनिधी, उप-कंत्राटदार, सल्लागार आणि तृतीय पक्ष पुरवठादार:
- पूर्णता, अचूकता, विश्वासार्हता, उपयुक्तता, उपयोगिता, व्यापार करण्याची क्षमता, उपलब्धता, गुणवत्ता, कोणत्याही उद्देशासाठी उपयोगिता, गैर-उल्लंघन, सुसंगतता आणि/किंवा सुरक्षितता यासह परंतु तेवढ्यापुरतेच मर्यादित न राहता कोणत्याही आणि सर्व व्यक्त किंवा निहित प्रतिनिधित्व, हमी आणि/किंवा कोणत्याही प्रकारच्या अटींचा अस्वीकार करतात;
- वेबसाइट किंवा कोणत्याही कनेक्ट केलेल्या वेबसाइटच्या तुमच्या वापरामुळे किंवा त्या संबंधात तुमच्या सिस्टम किंवा डिव्हाइसच्या कोणत्याही संसर्ग किंवा दूषिततेसाठी जबाबदार किंवा उत्तरदायी नाहीत आणि हमी देत नाही की वेबसाइट, वेबसाइट उपलब्ध करून देणारे सर्व्हर किंवा कोणत्याही कनेक्ट केलेल्या वेबसाइट व्हायरस, ट्रोजन हॉर्स, वर्म्स, सॉफ्टवेअर बॉम्ब किंवा तत्सम वस्तू किंवा प्रक्रिया किंवा इतर हानिकारक घटकांपासून मुक्त आहेत;
- तुमच्या वेबसाइटच्या किंवा कोणत्याही कनेक्ट केलेल्या वेबसाइटच्या वापरामुळे किंवा त्यावरील कंटेंट आणि वापरकर्ता साहित्याच्या संदर्भात व्यत्यय, विलंब, अयोग्यता, त्रुटी किंवा चुकांसाठी जबाबदार किंवा उत्तरदायी नाहीत; आणि
- वेबसाइट, किंवा कोणतीही कनेक्ट केलेली वेबसाइट, लिंक केलेल्या मायक्रोसाइट्स, कोणतीही सामग्री, तृतीय-पक्ष कंटेंट किंवा ऑफर केलेल्या सेवा निर्बाध किंवा त्रुटी-मुक्त किंवा अचूक असतील किंवा तुमच्या उद्देशानुसार असतील याची हमी देत नाहीत.
6. नुकसानभरपाई
तुम्ही कंपनी, तिचे सहयोगी, असोशिएट आणि समूह कंपन्या आणि त्यांचे संबंधित संचालक, प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी, कर्मचारी, अधिकारी, भागधारक, एजंट, प्रतिनिधी, उप-कंत्राटदार, सल्लागार आणि तृतीय-पक्ष प्रदाते यांना अशा सर्व कायदेशीर शुल्कासह, सर्व नुकसान, दावे आणि हानीच्या विरोधात पूर्णपणे नुकसानभरपाई, बचाव आणि उपद्रवापासून दूर ठेवण्यास सहमती देता जे पुढील गोष्टींमुळे उद्भवू शकतात: (I) तुम्ही या वापराच्या अटींपैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन केल्यास; (II) कोणत्याही तृतीय-पक्षाच्या अधिकाराचे तुमच्याद्वारे उल्लंघन झाल्यास, ज्या मध्ये कोणत्याही मर्यादेशिवाय प्रसिद्धी, गोपनीयता किंवा बौद्धिक संपदा अधिकार सामील असतील; (III) तुम्ही कोणत्याही लागू कायद्याचे उल्लंघन केल्यास; (iv) तृतीय पक्षासह कोणत्याही व्यक्तीद्वारे तुमच्या खात्याचा अनधिकृत, अयोग्य, बेकायदेशीर किंवा चुकीचा वापर झाल्यास, मग तुमच्याद्वारे ते अधिकृत किंवा त्याची परवानगी असो वा नसो; आणि (v) या वापराच्या अटींनुसार किंवा लागू कायद्यांतर्गत कोणत्याही प्रतिनिधित्व, हमी, करार किंवा वचनाचा तुम्ही भंग केल्यास. हे नुकसानभरपाई दायित्व या वापराच्या अटी आणि वेबसाइटचा तुमचा वापर संपुष्टात आल्यानंतर किंवा समाप्तीनंतर सुद्धा टिकून राहील.
7. तृतीय पक्ष वेबसाइट्स
- या वेबसाइटमध्ये कंपनीशी संबंधित नसलेल्या तृतीय पक्षांच्या मालकीच्या आणि त्यांच्या द्वारे ऑपरेट केलेल्या इतर वेबसाइट्सच्या लिंक असू शकतात (“तृतीय-पक्ष वेबसाइट”). तृतीय-पक्षाच्या वेबसाइट्स कंपनीच्या नियंत्रणाखाली राहत नाहीत आणि कंपनी कोणत्याही तृतीय-पक्षाच्या वेबसाइट्सच्या कंटेंटसाठी किंवा तृतीय-पक्षाच्या वेबसाइट्समध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही हायपरलिंकसाठी जबाबदार असणार नाही आणि अशा कोणत्याही तृतीय-पक्ष वेबसाइट्सच्या कंटेंटच्या संदर्भात कोणतेही प्रतिनिधित्व किंवा हमी देत नाही.
- कोणत्याही तृतीय-पक्षाच्या वेबसाइट्सचा तुमचा अॅक्सेस आणि वापर पूर्णपणे तुमच्या स्वत:च्या जोखमीवर आहे. कंपनी तुमच्या आणि तृतीय पक्षाच्या वेबसाइटमधील कोणत्याही व्यवहारासाठी पक्षकार असणार नाही. तृतीय-पक्षाच्या वेबसाइटचा तुमचा वापर या वापराच्या अटींव्यतिरिक्त त्या तृतीय-पक्षाच्या वेबसाइटच्या अटी आणि शर्तींच्या अधीन आहे. काही विसंगती असल्यास या वापराच्या अटी प्रचलित राहतील.
- वेबसाइटमध्ये तृतीय-पक्षाच्या जाहिराती, प्रमोशन, इ. असू शकतात (ज्यात तृतीय-पक्षाच्या वेबसाइट्ससाठी एम्बेडेड हायपरलिंक्स किंवा रेफरल बटणे असू शकतात किंवा नसू शकतात). अशा जाहिरातींचे प्रदर्शन कोणत्याही प्रकारे संबंधित जाहिरातदाराची कंपनी, त्याची उत्पादने किंवा सेवा किंवा अशा कोणत्याही तृतीय-पक्षाच्या वेबसाइटचे केलेले समर्थन किंवा शिफारस सूचित करत नाही. जाहिरातदार आणि त्याची उत्पादने आणि/किंवा सेवांशी संबंधित सर्व माहितीसाठी तुम्ही थेट संबंधित जाहिरातदाराचा संदर्भ घ्यावा. कंपनी तुम्ही आणि संबंधित तृतीय पक्ष यांच्यातील कोणत्याही परस्परसंवादासाठी कोणतीही जबाबदारी स्वीकारत नाही आणि अशा परस्परसंवाद आणि/किंवा जाहिरातदाराच्या उत्पादनांमधून आणि/किंवा सेवांमधून उद्भवलेल्या कोणत्याही दोष, कमतरता, दावे, इत्यादींमुळे उद्भवलेल्या किंवा कोणत्याही प्रकारे संबंधित दायित्वापासून स्वतःला मुक्त करते.
8. सूचना आणि काढून टाकण्याची प्रक्रिया
- कंपनी वापरकर्ता साहित्यासह वेबसाइटवर प्रकाशित कोणत्याही डेटा, माहिती, कंटेंट किंवा साहित्याचे समर्थन किंवा प्रचार करत नाही आणि त्याच्याशी संबंधित कोणत्याही आणि सर्व दायित्वांचे स्पष्टपणे अस्वीकरण करते.
- जर तुम्हाला वाटत असेल की वेबसाइटमध्ये असा कोणताही डेटा, माहिती, कंटेंट किंवा साहित्य आहे जे कायद्याच्या किंवा त्याखालील लागू कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करणारी असू शकतात, तर तुम्ही [email protected] वर ईमेल सूचना पाठवून कंपनीला तसे सूचित करू शकता. कृपया लक्षात ठेवा की असे करून तुम्ही कायदेशीर प्रक्रिया सुरू करत आहात. खोटे दावे करू नका. या प्रक्रियेचा गैरवापर केल्याने तुमच्या अकाऊंटचे निलंबन आणि/किंवा इतर कायदेशीर परिणाम होऊ शकतात. कृपया लक्षात घ्या की ही तरतूद कायदा, माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे) नियम, 2011 इ.च्या संबंधित तरतुदींसह भारतातील लागू कायद्यांद्वारे नियंत्रित केली जाईल. तुम्ही या कायदेशीर प्रक्रियेच्या संदर्भात तुमच्या स्वतःच्या खर्चावर आणि जबाबदारीवर स्वतंत्र कायदेशीर सल्ला घेऊ शकता.
- कंपनी कोणताही डेटा, माहिती, कंटेंट किंवा साहित्य केवळ न्यायालयाच्या आदेशाद्वारे वास्तविक ज्ञान मिळाल्यावर किंवा योग्य सरकार किंवा सरकारी एजन्सीद्वारे असे सूचित केल्यावर काढून टाकेल की जर उक्त डेटा, माहिती, कंटेंट किंवा साहित्य वेबसाइटवरून हटविली गेली नाही तर कलम 19(2) शी संबंधित बेकायदेशीर कृत्ये केली जातील.
- वापरकर्त्याला सूचना न देता आणि कंपनी किंवा तिचे संचालक, प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी, अधिकारी, कर्मचार्यांवर कोणतेही उत्तरदायित्व न देता कंपनी तिच्या विवेकबुद्धीनुसार असा कोणताही डेटा, माहिती, कंटेंट किंवा साहित्य काढून घेण्याचा अधिकार (तसे करण्याच्या बंधनाशिवाय) राखून ठेवते जो कंपनीच्या मते कायद्याचे किंवा त्याखालील नियमांच्या कोणत्याही लागू तरतुदीचे उल्लंघन करतो.
9. समर्थन
ग्राहक समर्थन आणि ग्राहक तक्रारी
ONDC नेटवर्कमधील बायर अॅप्सद्वारे दिलेल्या तुमच्या ऑर्डर्सशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, तुम्ही ONDC च्या तक्रार अधिकारी (ई-कॉमर्स नियमांनुसार) अनुपमा प्रियदर्शिनी यांना [email protected] वर लिहू शकता.
वेबसाइटवरील सामग्रीशी संबंधित तक्रारी
IT कायदा 2000 अंतर्गत वेबसाइटशी संबंधित कोणत्याही प्रश्न किंवा तक्रारीसाठी, कृपया आमच्या नोडल अधिकाऱ्यांना [email protected] वर लिहा.
10. समाप्ती
- कंपनी किंवा तिच्या संचालकांना, प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी, अधिकारी किंवा कर्मचार्यांना सूचना आणि उत्तरदायित्व न देता, सोयीसाठी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव जसे तुमच्याकडून यापैकी कोणत्याही वापराच्या अटी, गोपनीयता धोरण, अधिनियम आणि/किंवा त्या खालील नियमांसह कोणत्याही कायद्याचे किंवा इतर कोणत्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय असल्यास किवा खरंच उल्लंघन झाले असल्यास किंवा कंपनीला योग्य वाटणार्या इतर कोणत्याही कारणास्तव, वेबसाइटच्या सर्व किंवा काही भागावरील तुमचा अॅक्सेस संपुष्टात आणण्याचा अधिकार कंपनीने राखून ठेवला आहे,
11. इतर बाबी
- कोणत्याही तक्रारीबद्दल कंपनीला सूचित करण्याचा सर्वात जलद आणि सोपा मार्ग म्हणजे आमच्या तक्रार अधिकाऱ्याला [email protected] वर ईमेल सूचना पाठवणे.
- या वापराच्या अटींमध्ये तुम्ही आणि कंपनीमधील संपूर्ण करार समाविष्ट आहे आणि वापरकर्त्याच्या अॅक्सेस आणि/किंवा वेबसाइटच्या वापरासंदर्भात वापरकर्ता आणि कंपनी यांच्यातील सर्व पूर्व करारांची जागा घेतली आहे.
- या वापर अटींमधील कोणतीही तरतूद बेकायदेशीर, अवैध किंवा अंमलात आणण्यायोग्य नसल्याचे आढळल्यास, ज्या प्रमाणात अशी तरतूद बेकायदेशीर, अवैध किंवा अन्यथा लागू करण्यायोग्य नाही, तेवढीच ती विभक्त करून हटविली जाईल आणि उर्वरित तरतुदी पूर्णतः टिकून व प्रभावी राहतील, आणि बंधनकारक आणि अंमलबजावणी करण्यायोग्य राहतील.
- तुम्ही पुष्टी करता की तुमचे प्रतिनिधित्व, हमी, वचन व करार, आणि नुकसानभरपाई, दायित्वाची मर्यादा, स्वीकृत परवाने, शासित कायदा आणि गोपनीयतेशी संबंधित कलमे वेळेच्या प्रवाहात आणि या वापराच्या अटींच्या समाप्तीनंतर देखील टिकून राहतील.
- या वापर अटींखाली जर कोणतीही स्पष्ट सूट देण्यात आली असेल किंवा कोणत्याही अधिकाराचा त्वरित वापर करण्यात आला नसेल, तर त्याचा अर्थ असा होणार नाही की अशा सूट देणे सुरूच राहील किंवा अशी अपेक्षा निर्माण होणार नाही.की पुढे ही गैर-अंमलबजावणीची सुरूच राहील.
- तुम्ही सहमत आहात की नैसर्गिक आपत्ती, युद्ध, रोग, क्रांती, दंगल, नागरी गोंधळ, संप, लॉकआऊट, पूर, आग, उपग्रह त्रुटी, नेटवर्क त्रुटी, सर्व्हर त्रुटी, कोणत्याही सार्वजनिक उपयोगितेत आलेली त्रुटी, दहशतवादी हल्ला, नेटवर्क देखभाल, वेबसाइट देखभाल, सर्व्हर देखभाल, किंवा कंपनीच्या नियंत्रणाबाहेरील कोणत्याही कारणामुळे वेबसाइटची किंवा त्यातील कुठल्या भागाची उपलब्धता न मिळाल्यास कंपनीचे तुमच्याप्रती कोणतेही दायित्व असणार नाही.
- अन्यथा निर्दिष्ट केल्याशिवाय, वेबसाइट केवळ मनोरंजन आणि प्रोग्रामना प्रोत्साहन देण्यासाठी सादर केली जाते. वेबसाइट भारताव्यतिरिक्त इतर ठिकाणी वापरण्यासाठी योग्य किंवा उपलब्ध आहे असे कोणतेच प्रतिनिधित्व कंपनी करत नाही. जे लोक भारताव्यतिरिक्त इतर ठिकाणांहून वेबसाइट ॲक्सेस करतात, ते आपणहून आणि स्वतःच्या जोखमीवर असे करतात आणि जर आणि जितक्या प्रमाणात स्थानिक कायदे लागू असतील, त्या स्थानिक कायद्यांचे पालन करण्यासाठी पूर्णपणे जबाबदार असतील.
- गोपनीयता धोरण (वेबसाइटवर दिल्याप्रमाणे), आणि वेबसाइटवर समाविष्ट केलेले इतर कोणतेही दस्तऐवज, सूचना, इ. हे या वापराच्या अटींसोबत वाचले जातील आण या वापराच्या अटींचाच एक भाग असतील. गोपनीयता धोरण वापराच्या अटींचा अविभाज्य भाग बनतील आणि हे दोन्ही दस्तऐवज वापरकर्ता करार आणि कंपनी आणि वापरकर्ता यांच्यातील कायदेशीर बंधनकारक करार तयार करतात.
- या वापराच्या अटींना भारताचे कायदे लागू होतील आणि त्या कायद्यांनुसारच त्यांचा अर्थ लावला जाईल आणि परस्परविरोधी कायद्यांच्या कोणत्याही तत्त्वांना प्रभाव न देता, दिल्ली येथील न्यायालयांच्या विशेष अधिकारक्षेत्राच्या अधीन असतील.
- ‘कॉन्ट्रा प्रोफेरेंटम’ नियम म्हणून ओळखल्या जाणार्या कंत्राटी रचनेचा नियम या वापराच्या अटींना लागू होणार नाही.