जगातील पहिल्या सर्वसमावेशक मोठ्या प्रमाणातील ई-कॉमर्स प्रणालीचा एक भाग व्हा.
भारतात, 12 दशलक्षाहून अधिक विक्रेते उत्पादने आणि सेवा यांची विक्री करून किंवा त्यांची पुनर्विक्री करून आपला उदरनिर्वाह करतात. परंतु, यापैकी केवळ 15,000 विक्रेत्यांनी (एकूण पैकी 0.125%) ई-कॉमर्सला सुरुवात केली आहे. ई-रिटेल विशेषत: लहान शहरे आणि ग्रामीण भागातील बहुसंख्य विक्रेत्यांच्या आवाक्याबाहेर राहिले आहे.
ONDC ने भारतातील ई-रिटेल पोहोच सध्याच्या 4.3% वरून त्याच्या कमाल क्षमतेपर्यंत वाढवण्याची अनोखी संधी ओळखली आहे. सर्व प्रकारच्या आणि आकाराच्या विक्रेत्यांचा लोकसंख्येच्या प्रमाणात समावेश शक्य करून देशातील ई-कॉमर्स प्रवेश वाढवणे हे आमचे ध्येय आहे.
Read more
UPI, AADHAAR आणि त्यासारख्या इतर पायाभूत डिजिटल सुविधांचा लोकसंख्येच्या प्रमाणात यशस्वी अवलंब करून दाखवण्यात भारत जगभरामध्ये आघाडीवर आहे. ONDC (ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स) हा ओपन-सोर्स वैशिष्ट्यांवर आधारित ओपन प्रोटोकॉलद्वारे ई-कॉमर्स सक्षम करून देशातील ई-कॉमर्सच्या कार्यपद्धतीत बदल करण्याचा आणखी एक तंत्रज्ञान-आधारित उपक्रम आहे.
या उपक्रमामुळे केवळ ई-कॉमर्सचा जलद अवलंब करणेच सुलभ होणार नाही तर भारतातील स्टार्टअप्सच्या वाढीला चालना आणि बळकटी मिळेल. ओपन प्रोटोकॉलद्वारे आवश्यक प्रमाणात वाढवण्यालायक आणि किफायतशीर ई-कॉमर्सची सुविधा उपलब्ध करून, ONDC स्टार्टअप्सना सहकार्याने वाढण्यास सक्षम करेल.
ONDC ची स्थापना डिसेंबर 2021 मध्ये सेक्शन 8 कंपनी म्हणून करण्यात आली, ज्यामध्ये क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि प्रोटीअन ईजीओव्ही टेक्नॉलॉजीज लिमिटेड हे संस्थापक सदस्य आहेत. ONDC मध्ये गुंतवणूक केलेल्या इतर संस्था आहेत:
क्यूसीआय
प्रोटीअन जीओव्ही टेक्नॉलॉजीज
एम/ओ - एमएसएमई
एम/ओ - कॉमर्स अँड इंडस्ट्री
एम/ओ - कंझ्युमर अफेअर्स
कपॅसिटी बिल्डिंग कमिशन
अवाना कॅपिटल
डिजिटल इंडिया फाउंडेशन
एचयूएल
ONDC
Learn how to sell