• Language icon
 • ONDC Logo

  Do you want to change your default language?

  Continue Cancel

  गोपनीयता धोरण

  आमची प्रतिबद्धता

  ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स ("आम्ही", "वेबसाइट", "ONDC") डेटा विषयाच्या ("आपण", "आपले", "ग्राहक", "वापरकर्ता") गोपनीयतेच्या अधिकारासाठी आणि तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबद्ध आहे. आमच्या प्रतिबद्धतेवर तुमचा विश्वास आणि आत्मविश्वास मिळविण्यासाठी, आम्ही आमच्या गोपनीयता पद्धती पूर्णपणे उघड करीत आहोत. आम्ही कोणत्या प्रकारच्या वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती संकलित करतो आणि आम्ही ही माहिती कशी वापरतो हे समजून घेण्यासाठी आमचे गोपनीयता विधान वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो. हे विधान पूर्णपणे ondc.org वर गोळा केलेल्या माहितीवर लागू आहे.

  हे गोपनीयता धोरण ज्या ठिकाणी हे गोपनीयता धोरण पोस्ट केले आहे, त्या साइट्स आणि अ‍ॅप्लिकेशनवर प्रदान केलेल्या किंवा संकलित केलेल्या माहितीच्या वापराचे वर्णन करते. आम्ही ज्या प्रदेशात कार्य करतो त्या प्रदेशात लागू असलेल्या कायद्याच्या अनुषंगाने आम्ही या गोपनीयता धोरणाचे अनुसरण करतो. काही प्रकरणांमध्ये, आम्ही विशिष्ट सेवा किंवा प्रदेशांसाठी विशिष्ट अतिरिक्त डेटा गोपनीयता धोरणे प्रदान करू शकतो. त्या अटी या धोरणाच्या जोडीने वाचल्या गेल्या पाहिजेत.

  जेव्हा तुम्ही आम्हाला तृतीय-पक्ष साइट किंवा प्लॅटफॉर्मवर माहिती प्रदान करता (उदाहरणार्थ, आमच्या सोशल मीडिया लॉगिन सारख्या अ‍ॅप्लिकेशनद्वारे), तेव्हा ती माहिती आमच्या अ‍ॅप्लिकेशन्सशी लिंक असलेल्या त्या तृतीय-पक्ष साइटद्वारे आम्ही गोळा केलेली असते आणि ती या गोपनीयता धोरणात समाविष्ट असते, तसेच तृतीय-पक्ष साइट किंवा प्लॅटफॉर्म जी माहिती गोळा करतात, ती माहिती तृतीय-पक्ष साइट किंवा प्लॅटफॉर्मच्या गोपनीयता धोरणाच्या अधीन असते. तुम्ही तृतीय-पक्षाच्या साइटवर किंवा प्लॅटफॉर्मवर केलेल्या गोपनीयता निवडी, आम्ही आमच्या साइटद्वारे थेट गोळा केलेल्या माहितीच्या वापरावर लागू होणार नाहीत. आमच्या साइटमध्ये आमच्या मालकीच्या किंवा नियंत्रित नसलेल्या इतर साइट्सच्या लिंक असू शकतात आणि आम्ही त्या साइट्सच्या गोपनीयता पद्धतींसाठी जबाबदार नाही. तुम्ही आमच्या साइट्स किंवा अ‍ॅप्लिकेशन्स सोडता, तेव्हा जागरूक राहण्यासाठी आणि तुमची वैयक्तिक माहिती संकलित करू शकतील अशा इतर साइट्सची गोपनीयता धोरणे वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो.

  येथे विशेषत: परिभाषित न केलेल्या सर्व ठळक शब्दांचा अर्थ, वापराच्या अटींमध्ये दिल्यानुसारच असेल. हे गोपनीयता धोरण तुम्ही वापरत असलेल्या सेवेला (वेबसाइट, अ‍ॅप्लिकेशन किंवा इतर सेवा) लागू असलेल्या वापराच्या अटींसह एकत्रितपणे वाचले पाहिजे.

  वापरकर्त्याची संमती

  ONDC ची सेवा वापरून (उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही आमच्या साइटवर रोजगाराच्या संधीसाठी नोंदणी करता, स्पर्धा किंवा प्रमोशनमध्ये भाग घेता, आमच्याशी संवाद साधता), तुम्ही या धोरणात वर्णन केल्यानुसार, तुमची वैयक्तिक माहिती संग्रहित करणे, वापरणे आणि सामायिक करणे यास आम्हाला सहमती देता. काही प्रकरणांमध्ये, विशेषत: तुम्ही डेटा संरक्षण नियमांद्वारे शासित असलेल्या देशात राहत असल्यास, आमच्या सेवांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आम्ही तुम्हाला स्पष्ट संमती देण्यास सांगू शकतो.

  कोणत्याही फिरत्या वापरकर्त्याच्या प्रोफाइलच्या बाबतीत किंवा तुम्ही जगभरातील विविध देशांना भेट देणारे प्रवासी असाल आणि ONDC च्या सेवांचा लाभ घेत असाल, तर आम्ही तुमचा प्राथमिक देश म्हणून नोंदणीच्या देशाचा (जेथे तुम्ही आम्हाला प्रथमच तुमचे तपशील प्रदान करता) विचार करू आणि नोंदणीच्या वेळी मिळालेल्या संमती, तुमच्या वैयक्तिक माहितीच्या प्रक्रियेसाठी वैध असतील. नोंदणीच्या वेळी त्या देशाच्या कायद्यानुसार लागू होणार्‍या गोपनीयता अटी तुम्हाला लागू होतील.