ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स ("आम्ही", "वेबसाइट", "ONDC") डेटा विषयाच्या ("आपण", "आपले", "ग्राहक", "वापरकर्ता") गोपनीयतेच्या अधिकारासाठी आणि तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी प्रतिबद्ध आहे. आमच्या प्रतिबद्धतेवर तुमचा विश्वास आणि आत्मविश्वास मिळविण्यासाठी, आम्ही आमच्या गोपनीयता पद्धती पूर्णपणे उघड करीत आहोत. आम्ही कोणत्या प्रकारच्या वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती संकलित करतो आणि आम्ही ही माहिती कशी वापरतो हे समजून घेण्यासाठी आमचे गोपनीयता विधान वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो. हे विधान पूर्णपणे ondc.org वर गोळा केलेल्या माहितीवर लागू आहे.
हे गोपनीयता धोरण ज्या ठिकाणी हे गोपनीयता धोरण पोस्ट केले आहे, त्या साइट्स आणि अॅप्लिकेशनवर प्रदान केलेल्या किंवा संकलित केलेल्या माहितीच्या वापराचे वर्णन करते. आम्ही ज्या प्रदेशात कार्य करतो त्या प्रदेशात लागू असलेल्या कायद्याच्या अनुषंगाने आम्ही या गोपनीयता धोरणाचे अनुसरण करतो. काही प्रकरणांमध्ये, आम्ही विशिष्ट सेवा किंवा प्रदेशांसाठी विशिष्ट अतिरिक्त डेटा गोपनीयता धोरणे प्रदान करू शकतो. त्या अटी या धोरणाच्या जोडीने वाचल्या गेल्या पाहिजेत.
जेव्हा तुम्ही आम्हाला तृतीय-पक्ष साइट किंवा प्लॅटफॉर्मवर माहिती प्रदान करता (उदाहरणार्थ, आमच्या सोशल मीडिया लॉगिन सारख्या अॅप्लिकेशनद्वारे), तेव्हा ती माहिती आमच्या अॅप्लिकेशन्सशी लिंक असलेल्या त्या तृतीय-पक्ष साइटद्वारे आम्ही गोळा केलेली असते आणि ती या गोपनीयता धोरणात समाविष्ट असते, तसेच तृतीय-पक्ष साइट किंवा प्लॅटफॉर्म जी माहिती गोळा करतात, ती माहिती तृतीय-पक्ष साइट किंवा प्लॅटफॉर्मच्या गोपनीयता धोरणाच्या अधीन असते. तुम्ही तृतीय-पक्षाच्या साइटवर किंवा प्लॅटफॉर्मवर केलेल्या गोपनीयता निवडी, आम्ही आमच्या साइटद्वारे थेट गोळा केलेल्या माहितीच्या वापरावर लागू होणार नाहीत. आमच्या साइटमध्ये आमच्या मालकीच्या किंवा नियंत्रित नसलेल्या इतर साइट्सच्या लिंक असू शकतात आणि आम्ही त्या साइट्सच्या गोपनीयता पद्धतींसाठी जबाबदार नाही. तुम्ही आमच्या साइट्स किंवा अॅप्लिकेशन्स सोडता, तेव्हा जागरूक राहण्यासाठी आणि तुमची वैयक्तिक माहिती संकलित करू शकतील अशा इतर साइट्सची गोपनीयता धोरणे वाचण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रोत्साहित करतो.
येथे विशेषत: परिभाषित न केलेल्या सर्व ठळक शब्दांचा अर्थ, वापराच्या अटींमध्ये दिल्यानुसारच असेल. हे गोपनीयता धोरण तुम्ही वापरत असलेल्या सेवेला (वेबसाइट, अॅप्लिकेशन किंवा इतर सेवा) लागू असलेल्या वापराच्या अटींसह एकत्रितपणे वाचले पाहिजे.
ONDC ची सेवा वापरून (उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही आमच्या साइटवर रोजगाराच्या संधीसाठी नोंदणी करता, स्पर्धा किंवा प्रमोशनमध्ये भाग घेता, आमच्याशी संवाद साधता), तुम्ही या धोरणात वर्णन केल्यानुसार, तुमची वैयक्तिक माहिती संग्रहित करणे, वापरणे आणि सामायिक करणे यास आम्हाला सहमती देता. काही प्रकरणांमध्ये, विशेषत: तुम्ही डेटा संरक्षण नियमांद्वारे शासित असलेल्या देशात राहत असल्यास, आमच्या सेवांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आम्ही तुम्हाला स्पष्ट संमती देण्यास सांगू शकतो.
कोणत्याही फिरत्या वापरकर्त्याच्या प्रोफाइलच्या बाबतीत किंवा तुम्ही जगभरातील विविध देशांना भेट देणारे प्रवासी असाल आणि ONDC च्या सेवांचा लाभ घेत असाल, तर आम्ही तुमचा प्राथमिक देश म्हणून नोंदणीच्या देशाचा (जेथे तुम्ही आम्हाला प्रथमच तुमचे तपशील प्रदान करता) विचार करू आणि नोंदणीच्या वेळी मिळालेल्या संमती, तुमच्या वैयक्तिक माहितीच्या प्रक्रियेसाठी वैध असतील. नोंदणीच्या वेळी त्या देशाच्या कायद्यानुसार लागू होणार्या गोपनीयता अटी तुम्हाला लागू होतील.
तुमचे वास्तविक भौगोलिक स्थान लपविणारी किंवा तुमच्या स्थानाचे चुकीचे तपशील देणारी कोणतीही यंत्रणा किंवा तंत्रज्ञानाद्वारे तुम्ही ONDC वेबसाइटवर प्रवेश करू नये किंवा वापरू नये (उदाहरणार्थ, सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी आभासी खाजगी नेटवर्क (VPN/प्रॉक्सी) वापरणे).
तुम्ही तुमचे वास्तविक भौगोलिक स्थान (उदाहरणार्थ, VPN, प्रॉक्सी इ.) लपविण्याच्या उद्देशाने कोणतीही यंत्रणा किंवा तंत्रज्ञान वापरून ONDC वेबसाइटवर प्रवेश केल्यास, तुमच्या अशा यंत्रणा/तंत्रज्ञानाच्या वापरामुळे तुमच्या वैयक्तिक माहितीचे किंवा डेटाचे संकलन, स्टोरेज किंवा प्रक्रिया करण्यासाठी ONDC जबाबदार किंवा उत्तरदायी असणार नाही.
विशिष्ट व्यक्ती किंवा नैसर्गिक व्यक्तीची ओळख (प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे) दर्शविणारी कोणतीही माहिती जसे की त्या व्यक्तीचे नाव, पोस्टल पत्ता, ईमेल अॅड्रेस आणि त्या विशिष्ट व्यक्तीला सूचित करणारा किंवा तिची ओळख दाखविणारा मोबाइल नंबर अशी कोणतीही माहिती ‘वैयक्तिक माहिती’ किंवा ‘PII’ म्हणून परिभाषित केली जाते. जेव्हा निनावी माहिती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वैयक्तिक माहितीशी संबंधित असते, तेव्हा परिणामी माहिती देखील वैयक्तिक माहिती म्हणून हाताळली जाऊ शकते.
ONDC तुमच्या संमतीशिवाय PII गोळा करत नाही. ONDC आणि त्याचे सेवा भागीदार त्यांची वेबसाइट ऑपरेट करण्यासाठी आणि सेवा प्रदान करण्यासाठी तुमचा PII वापरू शकतात.
तुम्ही वेबसाइट वापरता, तेव्हा आम्ही तुमच्याबद्दल पुढील वैयक्तिक माहिती मागू आणि गोळा करू शकतो आणि या माहितीशिवाय तुम्ही विनंती केलेल्या सर्व सेवा आम्ही प्रदान करू शकणार नाही;
वेबसाइटवर आणि सेवांसाठी काही वैशिष्ट्ये वापरण्यासाठी, तुम्ही वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या फॉर्मद्वारे मूलभूत संपर्क माहिती प्रदान करू शकता, ज्यामध्ये पुढील समाविष्ट आहे परंतु तेवढ्या पुरतेच मर्यादित नाही:
जर तुम्ही आम्हाला वैयक्तिक पत्रव्यवहार पाठवलात, जसे की ईमेल किंवा पत्रे, किंवा इतर वापरकर्ते किंवा तृतीय पक्षांनी आम्हाला तुमच्या क्रिया किंवा वेबसाइटवरील पोस्टिंग पाठवल्या, तर आम्ही अशी माहिती संकलित आणि संग्रहित करू शकतो.
आम्ही इतर वेळी अतिरिक्त माहिती गोळा करू शकतो, जसे की जेव्हा तुम्ही फीडबॅक देता, तुमची ईमेल प्राधान्ये बदलता, सर्वेक्षणांना प्रतिसाद देता किंवा आमच्याशी संवाद साधता तेव्हा. या माहितीमध्ये तुमचे नाव, ई-मेल ID, मोबाईल नंबर, लोकेशन इत्यादींचा समावेश असू शकतो
आम्ही तुमच्या आणि तुमच्या सेवेच्या वापराबद्दल, आमच्यासोबत आणि आमच्या सेवा भागीदारांसोबतच्या संवादाविषयी तसेच तुमच्या काँप्युटर किंवा आमची सेवा वापरण्यासाठी वापरात येणारी इतर डिवाइस (जसे की मोबाइल डिवाइस, टॅब्लेट आणि इतर पाहण्याचे डिवाइस) विषयी माहिती संकलित करतो. या माहितीमध्ये खालील गोष्टी समाविष्ट असू शकतात, परंतु ते तेवढ्या पुरतेच मर्यादित नाही:
आमच्या वापरकर्त्यांसाठी "वेबसाइटची" प्रतिसादक्षमता सुधारण्यासाठी, वापरकर्ता ज्या कम्प्युटरचा वापर करतायत, त्याद्वारे त्यांची वैयक्तिक स्वारस्ये समजून घेण्यासाठी, आम्ही वेबसाइटवर भेट देणार्या प्रत्येक व्यक्तिला एक अद्वितीय, रॅनडम क्रमांक वापरकर्ता ओळख ("वापरकर्ता ID") म्हणून देऊन, त्यांची माहिती गोळा करण्यासाठी "कुकीज" किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक साधने वापरू शकतो. जोपर्यंत तुम्ही स्वेच्छेने स्वतःची ओळख पटवत नाही (उदाहरणार्थ, नोंदणीद्वारे), तोपर्यंत आम्ही तुमच्या कम्प्युटरवर कुकी जरी ठेवली, तरीही तुम्ही कोण आहात हे आम्हाला कळणार नाही. कुकी वर तेवढीच वैयक्तिक माहिती गोळा होऊ शकते जेवढी तुम्ही पुरवता. कुकी तुमच्या हार्ड ड्राइव्हवरून डेटा वाचू शकत नाही. आमचे जाहिरातदार सुद्धा त्यांच्या स्वतःच्या कुकीज तुमच्या ब्राउझरवर (जर तुम्ही त्यांच्या जाहिरातींवर क्लिक केले तर) ठेऊ शकतात, ही प्रक्रिया आम्ही नियंत्रित करत नाही. जेव्हा तुम्ही आमच्या वेबसाइटद्वारे, तुमच्या कम्प्युटर/लॅपटॉप/नोटबुक/मोबाइल/टॅब्लेट/पॅड/हँडहेल्ड डिव्हाइसद्वारे किंवा इंटरनेटशी कनेक्ट करण्यात सक्षम असलेल्या कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिवाइसद्वारे आमच्याशी संवाद साधता, तेव्हा आम्ही विशिष्ट प्रकारची माहिती प्राप्त करतो आणि संग्रहित करतो. अधिक तपशीलांसाठी, तुम्ही आमच्या कुकी धोरणाचा संदर्भ घेऊ शकता.
वेबसाइट तुमच्याबद्दलची वैयक्तिक माहिती फक्त तेव्हाच गोळा करेल आणि त्यावर प्रक्रिया करेल जेव्हा आमच्याकडे त्यासाठी कायदेशीर आधार असेल. ज्या कायदेशीर आधारावर आम्ही तुमच्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करू, त्यामध्ये तुमच्या वैयक्तिक माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी किंवा "कायदेशीर स्वारस्यांसाठी" प्रक्रिया करण्यासाठी तुमच्याकडून स्पष्ट संमती मिळवणे समाविष्ट आहे. हे तेव्हाच केले जाईल जेव्हा तुम्हाला आमच्या सेवा प्रदान करण्यासाठी अशी प्रक्रिया करणे आवश्यक असेल.
आम्ही आमच्या सेवा देण्यासाठी, सेवा आणि मार्केटिंग कार्यांचे विश्लेषण करण्यासाठी, प्रशासित करण्यासाठी, वाढविणयसाठी आणि वैयक्तिकृत करण्यासाठी, तुमच्या नोंदणीवर प्रक्रिया करण्यासाठी आणि खाली नमूद केलेल्या प्रकरणांशी संबंधित तुमच्याशी संवाद साधण्यासाठी माहिती वापरतो. उदाहरणार्थ, आम्ही माहिती पुढील गोष्टींसाठी वापरतो:
तुम्ही वापरत असलेल्या डिवाइसच्या माध्यमातून किंवा तत्सम तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्याकडे ज्या कुकीज, IP अॅड्रेस, वेब बीकन्स संबंधित डेटा जमा होतो, तो वापरून आम्ही पर्सनलाईझ माहिती देतो. असे केल्याने, आम्ही तुम्हाला असा कंटेंट आणि/किंवा जाहिराती दाखवू शकतो ज्या तुमच्या स्वारस्यांशी अधिक संबंधित आहेत असे आम्हाला वाटते. जेव्हा आम्ही तुमचा डेटा गोळा करतो त्यावेळेस कृपया यासाठी स्पष्ट संमती द्यावी.
तुम्ही [email protected] वर कुकीज कॅप्चर करण्याच्या संदर्भात तुमच्या संमतीच्या पर्यायांमध्ये बदल करण्याची विनंती देखील करू शकता.
वापरकर्त्यांनी दिलेल्या माहितीमुळे आम्ही आमच्या सेवा सुधारू शकतो आणि तुम्हाला फारच वापरकर्ता-अनुकूल अनुभव देऊ शकतो.
तुम्ही दिलेली कोणतीही वैयक्तिकरित्या ओळख पटण्याजोगी माहिती, जर फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल प्लॅटफॉर्मवरील कमेन्ट्स, मेसेजेस, ब्लॉग किंवा स्क्रिबल यासारख्या सार्वजनिक डोमेनवर मुक्तपणे उपलब्ध असेल आणि/किंवा अॅक्सेस करण्यासारखी असेल, तर त्याला संवेदनशील मानली जाणार नाही. वेबसाइट किंवा अॅप्लिकेशनवरील सार्वजनिक विभागांवर वापरकर्त्याने पोस्ट केलेला/अपलोड केलेला/अॅक्सेस केलेला/संगीतलेला कोणताही कंटेंट हा प्रकाशित कंटेंट मानल्या जातो आणि या गोपनीयता धोरणाच्या अधीन राहून, वैयक्तिकरित्या ओळखण्याजोगी माहिती मानली जात नाही. जर तुम्ही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती सबमिट करण्यास नकार दिला, तर कदाचित आम्ही तुम्हाला काही सेवा देऊ शकणार नाही. कोणत्याही परिस्थितीत, तुम्ही आवश्यक वैयक्तिक माहिती न दिल्यामुळे जर तुम्हाला कोणत्या सेवा नाकारल्या गेल्या, तर त्यासाठी आम्ही जबाबदार आणि/किंवा उत्तरदायी राहणार नाही. वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर, तुमची वैयक्तिक माहिती अपडेट करण्यासाठी आम्ही वेळोवेळी तुमच्याशी संपर्क साधतो जेणेकरून आम्ही तुम्हाला अशा काही सुविधा देऊ शकू ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकेल/ज्यात तुम्हाला स्वारस्य असेल असे आम्हाला वाटते.
काही वेळा वेबसाइट वर सेवा देणार्या किंवा वेबसाइटला वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवणार्या महत्वाच्या भागीदारांना, आम्ही तुमची विशिष्ट वैयक्तिक माहिती उपलब्ध करून देऊ शकतो. ही वैयक्तिक माहिती फक्त आमच्या सेवा देण्यासाथी आणि सुधारण्यासाठी तसेच मार्केटिंग पैलू सुधारण्यासाठी शेअर केली जाईल; ती तृतीय पक्षांसह त्यांच्या मार्केटिंग हेतूंसाठी शेअर केली जाणार नाही. आम्ही तुमची वैयक्तिक माहिती खालील व्यक्तींशी शेअर करू शकतो:
गोपनीयता धोरणामध्ये नमूद केलेल्या उद्देशांनुसार, तुमच्या वैयक्तिक माहितीचे व्यवस्थापन आणि त्यावर प्रक्रिया करण्यासाठी, उदाहरणार्थ आमच्या वेबसाइट्स किंवा सेवांच्या वापराशी संबंधित क्रियांच्या होस्टिंगसाठी आम्ही तृतीय पक्ष प्रोसेसर वापरत असल्यास आम्ही तुमची माहिती उघड करू शकतो. वेबसाइटमध्ये विविध तृतीय-पक्ष वेबसाइट्सच्या लिंक्सचा समावेश असू शकतो जे तुमची वैयक्तिक माहिती गोळा करू शकतात. असे तृतीय-पक्ष प्लॅटफॉर्म आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत आणि त्यांनी गोळा केलेल्या तुमच्या माहितीचा वापर, त्याच्या गोपनीयता धोरणाद्वारे च्या अधीन असेल. एकदा तुम्ही आमचे सर्व्हर सोडले की (तुमच्या ब्राउझरवरील स्थान बारमधील URL तपासून तुम्ही कुठे आहात हे तुम्ही सांगू शकता), तुम्ही दिलेल्या कोणत्याही माहितीचा वापर, तुम्ही भेट देत असलेल्या/वापरत असलेल्या वेबसाइट/अॅप्लिकेशनच्या ऑपरेटरच्या गोपनीयता धोरणाच्या अधीन असते. ते धोरण कदाचित आमच्यापेक्षा वेगळे असू शकते. आम्ही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य नसलेली माहिती, सार्वजनिकरित्या आणि आमच्या सेवा भागीदारांसह शेअर करू शकतो. उदाहरणार्थ, आम्ही आमच्या सेवांच्या सामान्य वापराबद्दल ट्रेंड दर्शविण्यासाठी माहिती सार्वजनिकपणे शेअर करतो.
वेबसाइट तुमची वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती उघड करू शकते जर तसे करणे कायद्यानुसार आवश्यक असेल किंवा आमच्या वेबसाइटवरील तुमच्या कृतींनी सेवा/वापर अटींचे किंवा विशिष्ट उत्पादने किंवा सेवांसाठी आमच्या कोणत्याही वापर मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असेल किंवा खालील नमूद गोष्टींसाठी अशी कृती आवश्यक आहे आम्हाला वाटत असेल:
जेव्हा तुम्ही ONDC (वेबसाइट्स किंवा त्याच्या उप साईट्स) च्या सेवा वापरता, तेव्हा तुमच्या विनंतीनुसार तुम्हाला तुमच्या वैयक्तिक माहितीचा अॅक्सेस देण्यासाठी आम्ही सर्व वाजवी प्रयत्न करतो. कोणतीही वैयक्तिक माहिती किंवा इतर माहिती चुकीची किंवा कमी असल्याचे आढळल्यास, ती शक्यतो दुरुस्त केली जाईल याची आम्ही खात्री करू, परंतु अशी वैयक्तिक माहिती किंवा इतर माहिती कायद्याद्वारे किंवा कायदेशीर व्यावसायिक हेतूंसाठी राखून ठेवण्यासाठी कोणत्याही आवश्यकतांच्या अधीन राहून.
अशा विनंत्यांवर प्रक्रिया करण्यापूर्वी, आम्ही वैयक्तिक वापरकर्त्यांना स्वतःची आणि माहितीचा अॅक्सेस, त्यात दुरूस्ती किंवा काढून टाकण्याची विनंती केलेली माहिती ओळखण्यास सांगतो. अवास्तविकरित्या वारंवार येणार्या किंवा पद्धतशीर असलेल्या, खूपच जास्त तांत्रिक प्रयत्नांची आवश्यकता असलेल्या, इतरांच्या गोपनीयतेला धोका निर्माण करणाऱ्या, किंवा अत्यंत अव्यवहार्य (उदाहरणार्थ, बॅकअप टेप्स वर असलेल्या माहिती बद्दल विनंती) अशा विनंत्यांवर प्रक्रिया करण्यास नकार देऊ शकतो. कोणत्याही परिस्थितीत, महितीचा अॅक्सेस आणि त्यात सुधारणा करण्याची सेवा आम्ही विनामूल्य देतो, पण जर असे करण्याला अत्यधिक प्रयत्नांची आवश्यकता नसेल तरच. आम्ही ज्या पद्धतीने काही सेवा राखतो, त्यामुळे तुम्ही तुमची माहिती हटवल्यानंतर सुद्धा त्याच्या उरलेल्या प्रती आमच्या सक्रिय सर्व्हरवरून हटवण्यासाठी थोडा कालावधी लागू शकतो आणि त्या आमच्या बॅकअप सिस्टममध्ये राहू शकतात.
डेटा विषय म्हणून तुम्हाला लागू असलेल्या अधिकारांचा वापर करण्यासाठी, तुम्ही आम्हाला [email protected] वर लिहू शकता आणि निर्दिष्ट अधिकारासाठी विनंती करू शकता. तुमच्या विनंत्यांवर जलद आणि अधिक कार्यक्षमतेने प्रक्रिया करण्यात आम्हाला मदत करण्यासाठी, कृपया अशा सर्व विनंत्या मांडताना विषय ओळीत (उदा. डेटा प्रवेश विनंती, डेटा पोर्टेबिलिटी विनंती, डेटा हटवण्याची विनंती) तुम्ही योग्य भाषा वापरत असल्याची खात्री करा.
तुमची वैयक्तिक माहिती गोळा करणे, वापर करणे आणि शेअर करण्यासंबंधी आम्ही तुम्हाला काही नियंत्रणे आणि निवडी देतो. लागू कायद्यानुसार, तुमच्या नियंत्र आणि निवडींमध्ये खालील समाविष्ट असू शकते:
तुम्ही आम्हाला ई-मेल पाठवून तुमच्याशी संबंधित चुकीची किंवा अपूर्ण वैयक्तिक माहिती दुरुस्त करण्यास सांगू शकता (ही अशी माहिती असते जी तुम्ही तुमच्या ONDC अकाऊंटमध्ये अपडेट करू शकत नाही). तुम्ही तुमच्या अकाऊंट सेटिंग्जद्वारे तुमची काही वैयक्तिक माहिती अॅक्सेस आणि अपडेट करू शकता. तुमची वैयक्तिक माहिती अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तुमची आहे. तुमच्या वैयक्तिक माहितीची अचूकता राखण्यासाठी वेबसाइट तुम्हाला ईमेलद्वारे थोड्या थोड्या दिवसांनी रीमाइंडर पाठवू शकते.
आमच्याबरोबरच्या तुमच्या सेवांच्या कार्यकाळात कधीही तुमची संमती मागे घेण्यासाठी, तुम्ही आम्हाला [email protected] वर ई-मेल पाठवून तसे कळवू शकता. आम्ही तुमच्या विनंतीचे पुनरावलोकन करू आणि तुम्हाला तुमची ओळख सत्यापित करण्यास सांगू. पडताळणीनंतर आम्ही तुमच्याद्वारे विनंती केलेली संमती मागे घेऊ आणि तुमच्या वैयक्तिक माहितीची पुढील प्रक्रिया थांबवू.
जर तुमच्या वैयक्तिक माहितीवर थेट मार्केटिंगसाठी प्रक्रिया केली जात असेल, तर तुम्ही आम्हाला ईमेल पाठवून या थेट मार्केटिंगसाठी तुमच्या डेटावर प्रक्रिया करणे थांबवण्यास सांगू शकता. कृपया लक्षात ठेवा की जर तुम्ही आम्हाला तुमच्याकडून वैयक्तिक माहिती गोळा करण्याची परवानगी दिली नाही, तर आम्ही तुम्हाला काही अनुभव, उत्पादने आणि सेवा देऊ शकणार नाही आणि आमच्या काही सेवा तुमच्या आवडी आणि प्राधान्ये विचारात घेऊ शकणार नाहीत. वैयक्तिक माहिती गोळा करणे अनिवार्य असल्यास, आम्ही ते संकलनाच्या ठिकाणी स्पष्ट करू जेणेकरुन तुम्ही सहभागी व्हावे की नाही याबद्दल विचारपूर्वक निर्णय घेऊ शकाल. आम्ही प्रक्रिया करत असलेल्या किंवा राखून ठेवलेल्या तुमच्याबद्दलच्या विशिष्ट वैयक्तिक माहितीबद्दल आणि त्या वैयक्तिक माहितीशी संबंधित तुमचे अधिकार याबद्दल तुम्हाला प्रश्न असल्यास, कृपया आमच्या कस्टमर सपोर्ट टीमशी संपर्क साधा.
वेबसाइट हेतुपुरस्सर 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी डिजाइन किंवा त्यांच्या करिता बनवलेली नाही. ONDC जाणूनबुजून 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही व्यक्तीला सेवांमध्ये नोंदणी करण्यासाठी किंवा इतर कोणतीही वैयक्तिकरित्या ओळखणारी माहिती देण्याची परवानगी देत नाही. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींची कोणतीही वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती पालकांच्या सत्यापित संमतीशिवाय वेबसाइटवर संकलित केली गेली आहे असे ONDC च्या लक्षात आले, तर ONDC अशी कोणतीही माहिती हटवण्यासाठी आणि पालकांना सूचित करण्यासाठी योग्य पावले उचलेल.
परंतु, आमच्या मते, मुलांच्या आमच्या सेवांच्या वापरावर लक्ष ठेवणे ही पालकांची जबाबदारी आहे. तरीही, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांकडून कोणतीही वैयक्तिक माहिती गोळा करून त्यावर प्रक्रिया करू नये किंवा त्या श्रेणीतील व्यक्तींना कोणतेही प्रमोशनल साहित्य पाठवू नये हे आमचे धोरण आहे. ONDC मुलांकडून कोणतीही वैयक्तिक माहिती मागत नाही किंवा मिळवू इच्छित नाही. जर पालकांना किंवा गर्डियनला असे वाटले की एखाद्या अल्पवयीन व्यक्तीने त्यांच्या पूर्व संमतीशिवाय ONDC ला वैयक्तिक माहिती प्रदान केली आहे, तर त्यांनी वेबसाइटवरून वैयक्तिक माहिती काढून टाकली जावी यासाठी कृपया [email protected] वर संपर्क साधावा.
अनधिकृत अॅक्सेस, नुकसान, नाश किंवा बदल यापासून तुमची माहिती सुरक्षित ठेवण्यसाठी आम्ही व्यवस्थापकीय, तांत्रिक आणि भौतिक सुरक्षा उपायांची सतत अंमलबजावणी आणि त्यांना अपडेट करत राहतो. तुमच्या माहितीचे संरक्षण करण्यासाठी आम्ही फायरवॉल आणि डेटा एन्क्रिप्शन आणि इन्फॉर्मेशन अॅक्सेस कंट्रोल्स सारखे काही सुरक्षा उपाय वापरू शकतो. तुमचे अकाऊंट क्रेडेन्शियल्स हरवले आहेत, चोरीला गेले आहेत, बदलले गेले आहेत किंवा अन्यथा त्यात गडबड केली गेली आहे किंवा तुमच्या अकाऊंटचा कोणताही वास्तविक किंवा संशयास्पद अनधिकृत वापर झाला आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, कृपया आमच्या कस्टमर सपोर्ट टीमशी संपर्क साधा.
हे गोपनीयता धोरण वेळोवेळी बदलू शकते. लागू कायद्यांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी या गोपनीयता धोरणाच्या अटींमध्ये वेळोवेळी आमच्या विवेकबुद्धीनुसार सुधारणा करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतो (“अपडेट केलेल्या अटी”). अपडेट केलेल्या अटी तात्काळ प्रभावी होतील आणि या गोपनीयता धोरणाच्या अटींची जागा घेतील. धोरणात केलेले बदल तुमच्या अधिकारांवर लक्षणीय परिणाम करत असतील किंवा कायद्यानुसार आवश्यक असतील, तर या गोपनीयता धोरणातील कोणत्याही बदलांबद्दल आम्ही तुम्हाला सूचित करू. कोणत्याही सुधारणांसाठी वेळोवेळी गोपनीयता धोरणाचे पुनरावलोकन करण्याची संपूर्ण जबाबदारी तुमची असेल. अपडेट केलेल्या अटी प्रकाशित झाल्यानंतर वेबसाइट वापरणे सुरू ठेवून, तुम्ही अपडेट केलेल्या अटींशी तुमची सहमती दर्शवता.
तुमची वैयक्तिक माहिती किंवा तुमच्या वैयक्तिक माहितीच्या वापरासंदर्भात या गोपनीयता धोरणाच्या वापराबाबत तुम्हाला कोणतीही माहिती किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास, कृपया आम्हाला [email protected] वर ईमेल करा.
ONDC द्वारे नियुक्त डेटा गोपनीयता अधिकारी श्री तुषार हसिजा आहेत ज्यांच्याशी [email protected] वर संपर्क साधला जाऊ शकतो.
Sign up - ONDC Participant Portal
ONDC SAHAYAK